Essay on raksha bandhan in marathi | रक्षाबंधन मराठी निबंध

रक्षा बंधन हा हिंदू धर्मामध्ये साजरा केला जाणारा सण आहे.हा सण भाऊ बहिणीचा पवित्र सण आहे. हा सण श्रावणात साजरा केला जातो.श्रावण महिना हा हिंदू धर्मात शुभ मानला आहे.

Essay on raksha bandhan in marathi


रक्षाबंधन हा आपल्या भारत देशातील खुप महत्वाचा सण आहे. हा सण आपल्या देशातील खुप लोकप्रिय सण आहे. रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या पवित्र प्रेमाचा सण मानला जातो. रक्षाबंधन या दिवसाला नारळी पौर्णिमा असे हि म्हणले जाते. रक्षाबंधन हा सण श्रावण पौर्णिमेला म्हणजेच ऑगस्ट महिन्यात साजरा केला जातो. जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम हे निःस्वार्थी व पवित्र असते. रक्षा म्हणजे रक्षण तर बंधन म्हणजे धागा. रक्षणासाठी बांधलेला पवित्र धागा म्हणजे रक्षाबंधन. समाजामध्ये लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. रक्षाबंधन दिवशी बहीण भावाच्या हाताला राखी बांधते. आणि त्याच औक्षण करते. हा दिवस सर्व बहीण भावाच्या खुप खास दिवस आहे. समाजात बहिण ताठ मानेने वागावी आणि तिच्या संरक्षणाची जबाबदारी भाऊ घेतो. 

raksha bandhan nibandh in marathi
Essay On Raksha Bandhan In Marathi


या दिवशी बहिण भावाच्या कपाळावर टिळा लावून त्याच्या मनगटावर राखी बांधते. भावाच्या सुखी,निरोगी, आयुष्यात विजय प्राप्त करो, त्याला दीर्घ आयुष्य लाभो त्याच्या जीवनासाठी मनोमन प्रार्थना करते. भाऊ हि बहिणीला रक्षण करण्याचे वचन देतो. आणि तो बहिणीला सुंदर अशी एक भेटवस्तू देतो. त्या दिवशी बहिण भावाला त्याच्या आवडीचे गोड पदार्थ खाऊ घालते. हा सण म्हणजे पराक्रम प्रेम, साहस यांचा संयोग आहे. समाजात लहानांपासून मोठ्यापर्यत हा सण साजरा होतो. राखीचा धागा हा नुसताच सुताचा दोरा नसून एक शील,स्नेह सतत संयमी ठेवणारे बंधन आहे. या धाग्याने खुप मने जुळून येतात. भारतीय परंपंरेत राखीच्या धाग्याला लोखंडी साखळी पेक्षा मजबूत मानले जाते. कारण बहीण-भावाच्या पवित्र नात्याला राखी खुप घट्ट बांधून ठेवत असते. रक्षाबंधन हा सण प्रेम, एकी व विश्वासाचे प्रतीक आहे. मंग गरीब बहिणीने भावाच्या हातात बांधलेला धागा काय,श्रीमंत बहिणीने भावाला बांधलेला सोन्याची राखी काय ऑनलाईन पाठवलेली राखी काय या सर्वामागे एकच भावना असते ती म्हणजे भावा बहिणीचे प्रेम  

रक्षा बंधन 'मराठी निबंध, Essay On Raksha Bandhan In Marathi
Raksha bandhan nibandh in marathi


या सणामागे अशीही कथा आहे. कि महाभारतात कृष्णाने द्रौपदीला बहीण मानून तिचे सदैव रक्षण केले. तर द्रौपदीनेही शिशुपालाच्या वधावेळी श्रीकृष्णच्या बोटाला जखम झाल्यावर क्षणाचा हि विलंब न लावता आपल्या साडीचा तुकडा फाडून तो जखमेवर बांधला. तेव्हापासून श्रीकृष्णाने द्रौपदीचे रक्षण करायचे ठरवले होते. त्याचप्रमाणे श्रीकृष्णाने द्रौपदी चे रक्षण केले. तेव्हा पासून रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. जगात असं कोण नाही कि हा दिवस साजरा करत नाही. रक्ताचे नाते असणारे भाऊ-बहिण असो किंवा मानलेले पण या नात्यामागची भावनाव पवित्र व खरी आहे. या नात्याप्रती भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे राखी पौर्णिमा या सगळीकडे गोड जेवण करतात. पुरणपोळी करतात. खास करून या दिवशी नारळी भात करण्याची प्रद्धत आहे. तसेस बहीण भावाला ओवाळताना गोड पदार्थानी एकमेकांचं तोंड गोड करतात. अशा प्रकारे हा दिवस साजरा करतात. 

Raksha bandhan nibandh in marathi

रक्षाबंधन ला सर्व दुकानात बाजारात सगळीकडे वेगवेगळ्या रंगेबीरंगी राख्या विकाय ठेवतात. त्या नुसत्या बघत राव असं वाटत. कळतच नाही त्यातील नेमकी कोणती राखी घ्यावी. इतक्या सुंदर सुंदर राख्या असतात. प्रत्येक बहीण जिला जी आवडेल ती घेतात. सगळ्यांना वाटत कि आपल्या भावाच्या हातात सगळ्यात सुंदर राखी असावी. त्या दिवशी सर्वजण नवीन कपडे घालतात. बहिण भाव खुप मस्त फोटो काढतात. त्या दिवशी सर्व कामांना सुट्टी देतात. बहिण -भाव खुप मस्त एकत्र वेळ घालवतात. खुप मज्जा करतात. रक्षाबंधन दिवशी सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. भावांचं नवे तर आपल्या देशाचे रक्षण करणारे सैनिक राखी बांधून आपलं प्रेम व्यक्त करतो. त्यामुळे कायम हा दिवस खुप खास मानला जातो. प्रत्येक जण कायम या दिवसाची वाट बघत असतो. हा दिवस सगळ्यांच्या आयुष्यात कायम आनंद देतो.बहिण- भावाचं नातं खुप वेगळं आहे. म्हणून तर खुप खास आहे.  

रक्षाबंधन निबंध मराठी                                                          
रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या पवित्र प्रेमाचा सण मानला जातो.

हा सण आपल्या देशातील खुप लोकप्रिय सण आहे. 

रक्षाबंधन या दिवसाला नारळी पौर्णिमा असे हि म्हणले जाते. 

रक्षाबंधन हा सण श्रावण पौर्णिमेला म्हणजेच ऑगस्ट महिन्यात साजरा केला जातो.

जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम हे निःस्वार्थी व पवित्र असते. 

या दिवशी बहिण भावाच्या कपाळावर टिळा लावून त्याच्या मनगटावर राखी बांधते. 

या दिवशी नारळी भात करण्याची प्रद्धत आहे. 

बहीण-भावाच्या पवित्र नात्याला राखी खुप घट्ट बांधून ठेवत असते. 

समाजात लहानांपासून मोठ्यापर्यत हा सण साजरा होतो.

रक्षाबंधन हा हिंदू उत्सवांपैकी एक महत्वाचा सण आहे. 

raksha bandhan essay in marathi

रक्षाबंधन हे सुरक्षिततेचे स्मारक आहे. राखी बांधल्याने एक बंधन आपल्यावर असते. हे बंधन असते ध्येयच्युत न होण्याचे. या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्याची आठवण राखी देते. राखी बांधताना बहिण भावाचे बंधन किंवा ध्येयाचे रक्षण करण्याची सूचना करते.


'' स्त्रीकडे विकृत दृष्टीने न पाहता तिच्या प्रती पवित्र दृष्टी ठेवा'' असा महान संदेश देणार्‍या या भारतीय संस्कृतीच्या सर्वश्रेष्ठ सणाला आपण कुटुंबापुरतेच मर्यादित ठेवले आहे. अशा सुंदर प्रेम आणि भावबंधनाच्या सणाला कुटूंबापुरतेच मर्यादित ठेवणे योग्य नाही. सख्या भावाकडे बहिणीची दृष्टी निर्मळ आणि प्रेमपूर्ण राहील.

रक्षाबंधन मराठी निबंध

समाजात स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची आवश्यकता आहे. सख्ख्या बहिणीने सख्ख्या भावाला राखी बांधण्यापेक्षा समवयस्क एखाद्या बहिणीने दुसर्‍या भावाला राखी बांधल्यास त्यामध्ये शील रक्षणाची जबाबदारी येते. सारांश, रक्षाबंधन म्हणजे स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे, रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेणे, रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या शुद्ध प्रेमाचा वाहता निर्झर! भाऊ आणि बहिण परस्पर प्रेरक, पोषक आणि पूरक आहेत हा संदेश देणारा हा उत्सव भारतीय संस्कृतीची अमूल्य देन आहे.

एक टिप्पणी भेजें

और नया पुराने